कोल्हापूर, दि.
23 (जि.मा.का.) : ग्रामीण भागातील 48 हजार 589 आणि शहरी भागातील 15 हजार 617कुटुंबांना
रोख 5 हजार रुपये प्रमाणे आज अखेर 32 कोटी 10 लाख 30 हजार रुपयांचे सानुग्रह अनुदान
वाटप करण्यात आले. पूरबाधित गावांतील 61 हजार 595 कुटुंबांना प्रत्येकी 10 किलो गहू
आणि 10 किलो तांदूळ याप्रमाणे 615.95 मे.टन मोफत गहू आणि तांदूळ वितरीत करण्यात आले
आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दिली.
सानुग्रह
अनुदान वाटप करण्यात आलेली तालुकानिहाय माहिती पुढीलप्रमाणे - करवीर ग्रामीण 8 हजार
534 शहरी 5 हजार 671 कुटुंब 7 कोटी 10 लाख
25 हजार, कागल ग्रामीण 1 हजार 776 कुटुंब शहरी भागात 61 कुटुंब 91 लाख 85 हजार, पन्हाळा
ग्रामीण 875 कुटुंब 43 लाख 75 हजार, शाहुवाडी
ग्रामीण 399 शहरी 53 कुटुंब 22 लाख 60 हजार, हातकणंगले ग्रामीण 8 हजार 650 शहरी 3 हजार 809 कुटुंब 6 कोटी 22 लाख 95 हजार, शिरोळ
ग्रामीण 26 हजार 209 शहरी 5
हजार 847 कुटुंब 16 कोटी 2 लाख 80 हजार, राधानगरी
ग्रामीण 747 कुटुंब 37 लाख 35 हजार, भुदरगड ग्रामीण 147 कुटुंब 7 लाख 35 हजार, गगनबावडा
ग्रामीण 101 कुटुंब संख्या 5 लाख 5 हजार व
धनादेशाव्दारे 83 कुटुंबाना 4 लाख 15 हजार, गडहिंग्लज ग्रामीण 917 शहरी 168 कुटुंब 54 लाख 25 हजार, आजरा ग्रामीण 38 व शहरातील 8 कुटुंब 2 लाख 30 हजार व धनादेशाव्दारे
ग्रामीण 38 व शहरातील 8 कुटुंबाना 2 लाख 70 हजार आणि चंदगड ग्रामीण 196 कुटुंबाना 9 लाख 80 हजार असे एकूण 32 कोटी 10 लाख 30 हजार
अनुदानाचे वाटप करण्यात आले.
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.