** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, August 3, 2019

'आधार'साठी बँक व पोस्ट कार्यालयाशी संपर्क करा -निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे



कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का.) : शासनाकडील आधार मशिनचे सध्या शासकीय जागेत स्थलांतराचे काम सुरू असल्याने आधार मशिन बंद आहेत. नागरिकांनी आधारशी संबंधित सुविधांसाठी बँक व पोस्ट ऑफिस येथील आधार केंद्राचा वापर करावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी केले आहे.
       बोगस शासकीय पत्रांच्या आधारे काही गावामध्ये आधारचे शिबीर आयोजित करण्यात आले आहेत. याबाबत तक्रार प्राप्त झाली आहे. सध्या शासनाकडील आधार मशिनचे शासकीय जागेत स्थलांतराचे काम सुरू असल्याने आधार मशिन बंद आहेत. नागरिकांनी आधारशी संबंधित सुविधांसाठी बँक व पोस्ट कार्यालये येथील आधार केंद्राचा वापर करावा खासगी जागेतील आधार केंद्रावर नोंद करू नये.  लवकरात लवकर शासकीय जागेत आधार नोंदणी केंद्र सुरू करण्यात येईल.
          बँक व पोस्ट कार्यालये येथे आधार केंद्रांची यादी resident.uidai.gov.in या संकेतस्थळावर पहावी.
00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.