** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, September 3, 2019

110 वी डाक अदालत 25 सप्टेंबरला



        कोल्हापूर, दि. 3 (जिमाका) : मुख्य पोस्ट मास्टर जनरल मुंबई येथे 110 व्या डाक अदालतीचे 25 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती डाकघर विभागाचे प्रवर अधीक्षक ईश्वर पाटील यांनी दिली.
       महाराष्ट्र आणि गोवा राज्याशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी किंवा कामकाजाबद्दल ज्या तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नसेल व समाधानकारक उत्तर मिळाले नसेल अशा तक्रारींची या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषत: टपाल वस्तू,मनीऑर्डर,बचत खाते,प्रमाणपत्र इत्यादी बाबतच्या तक्रारी विचारात घेतल्या जातील.
            संबंधितांनी डाक सेवेबाबतची तक्रार सहायक निदेशक डाक सेवा (ज.शि.) एस.जी.लिये आणि सचिव डाक अदालत,मुख्य पोस्टमास्टर जनरल यांचे कार्यालय,मुंबई जी.पी.ओ. इमारत, दुसरा माळा,मुंबई यांच्या नावे दोन प्रतींसह दिनांक 10 सप्टेंबरपर्यंत अथवा तत्पूर्वी पोहचेल अशारितीने पाठवावी.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.