पणजी-गोवा येथे 26 सप्टेंबर रोजी डाक अदालत
कोल्हापूर
दि. 11 (जिमाका) : पोस्टमास्तर जनरल, गोवा रिजन पणजी यांच्याद्वारे गुरुवार दि. 26
सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता 41 व्या डाक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती
प्रवर अधिक्षक डाकघर कोल्हापूर विभाग कोल्हापूर यांनी दिली.
गोवा रिजनशी संबंधित पोस्टाच्या सेवेविषयी
किंवा कामकाजाबाबत तक्रारींचे निवारण सहा आठवड्याच्या आत झाले नाही. तसेच समाधानकारक
उत्तर मिळाले नाही अशा तक्रारींबाबत या डाक अदालतीमध्ये दखल घेतली जाणार आहे. विशेषत:
टपाल वस्तु, मनिऑर्डर, बचत खाते, प्रमाणपत्र आदीबाबत या तक्रारीमध्ये विचार करण्यात
येणार आहे. तक्रारी तपशीलवार केलेल्या असाव्यात.
डाक सेवेबाबत तक्रार श्री. जी. राजेश सहायक
निदेशक, डाक सेवा, सचिव, डाक अदालत पोस्टमास्तर जनरल यांच्या कार्यालयात पणजी-गोवा
403001 यांच्या नावे दोन प्रतीसह दि. 16 सप्टेंबर पर्यंत पोहचतील अशा बेताने पाठवाव्यात.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.