कोल्हापूर,दि. 29 (जि.मा.का) : सोमवार दि. 21 ऑक्टोबर रोजी सुट्टीसाठी बाहेर न
जाता निर्भयपणे प्रथम आपले मतदान करावे. दिव्यांगांनीही आपल्या मतदानाचा हक्क बजावावा,
असे आवाहन युथ आयकॉन लेखिका, मुक्त पत्रकार सोनाली नवांगुळ यांनी केले.
भारताच्या घटनेने मतदानाचा मोलाचा
अधिकार प्रत्येक नागरिकाला दिला आहे. मतदानाच्या दिवशी सुट्टी समजून बरेचजण पर्यटनाला
जातात. परंतु त्या दिवशी सर्वप्रथम आपण आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे. त्यानंतर
सुट्टीची मजा घ्यावी, असे सांगून सोनाली नवांगुळ म्हणाल्या, समाजाच्या, देशाच्या समस्या
सोडविण्यासाठी योग्य प्रतिनिधी निवडण्याचा अधिकार आपल्याला दिला आहे. त्यासाठी मतदान
करणे आवश्यक आहे. तो आपला हक्क, कर्तव्य आणि जबाबदारीही आहे. येत्या 21 ऑक्टोबर रोजी
सर्व मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे. जिल्ह्यातील
प्रत्येक मतदान केंद्रांवर व्हिल चेअर, रॅम्प, मदतनीस अशी सोय दिव्यांग मतदारांसाठी
करण्यात आली आहे. अशा मतदारांनीही मोठ्या प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावावा, त्यासाठी
मी शुभेच्छा देते.
00000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.