** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, September 30, 2019

1 ऑक्टोबर जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन


1 ऑक्टोबर जागतिक जेष्ठ नागरिक दिनानिमित्त
मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन
कोल्हापूर - 27 (जिमाका) : सामाजातील जेष्ठ नागरिक यांचे स्थान बळकट व सुस्थितीत  होण्यासाठी तसेच त्यांचा वृद्धापकाळ चांगल्या प्रकारे जावा, समाजात त्यांचे जीवनमान सुसह्य व्हावे, आर्थिक क्षमता, कामाचा हक्क, शिक्षणाचा हक्क आणि सार्वजनिक मदत मिळण्यासाठी राज्य शासनाने जेष्ठ नागरिक धोरण जाहिर केले आहे, अशी माहिती समाजकल्याणचे सहाय्यक आयुक्त बाळासाहेब कामत यांनी दिली.
राज्यात जेष्ठ नागरिक धोरण जाहिर झाले असून, त्याला अनुसरुन राज्याचे सर्व समावेशक धोरण 2013 ची अंमलबजावणी करण्यासाठी दि. 1 ऑक्टोबर रोजी जागतिक जेष्ठ नागरिक दिन म्हणून साजरा करण्यात येणार आहे. स्थळ : ऑडिटोरिअम हॉल, सी.पी.आर. परिसर, कॅन्टीन जवळ, कोल्हापूर या दिवसाचे औचित्य साधून आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त, छत्रपती प्रमिलाराजे शाहू शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता व जिल्हा शल्य चिकित्स यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
या शिबिरामध्ये बी.पी., डोळे, दात, कान, नाक, घसा, ऑर्थो मानसोपचार समुपदेशन, फिजिओथेरपी, देह अवयव दान, हिमोग्लोबिन, ह्दय रोग, रक्त लघवी आदींची तपासणी या शिबीरात करण्यात येणार आहे. तसेच पोलिस विभागामार्फत मोफत कायदेविषयक सल्ला देण्यात येणार असून, एस.टी. महामंडळातर्फे जेष्ठ नागरिकांसाठी मोफत सवलतीचे पास देण्यात येणार आहे. तसेच तहसिलदार करवीर यांच्याकडून राज्य शासनाच्या योजनाबाबत माहिती दिली जाणार आहे.
जिल्ह्यातील जास्तीत-जास्त जेष्ठ नागरिकांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन समाज कल्याण विभागातर्फे करण्यात येत आहे.
0000



No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.