** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, September 1, 2019

अलमट्टीतून 6000 क्युसेक विसर्ग तर राधानगरीतून 800 क्युसेक विसर्ग



कोल्हापूर, दि. 1 (जि.मा.का.) : अलमट्टी धरणातून 6000 क्युसेक तर  राधानगरी विद्युत विमोचकातून 800 क्युसेक व कोयणेतून 25037 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी आज दिली.
            पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी  7 वाजता 17.2 फूट असून,    8 बंधारे पाण्याखाली आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.05 टीएमसी पाणीसाठा आहे.  तुळशी मोठा प्रकल्प, जंगमहट्टी, घटप्रभा कोदे लघुप्रकल्प, पाटगाव, कासारी व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.
           पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे 6 बंधारा पाण्याखाली आहे. भोगावती नदीवरील खडक कोगे हा 1 बंधारा पाण्याखाली आहे. वारणा नदीवरील चिंचोली हा 1 बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या अलमट्टी धरणात 123.081  टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 104.28 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
            जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.47 टीएमसी, वारणा 33.88  टीएमसी, दूधगंगा 24.76 टीएमसी, कासारी 2.77 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.70 टीएमसी, पाटगाव 3.67 टीएमसी, चिकोत्रा 1.51, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
            बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 17.2 फूट, सुर्वे 18.9 फूट, रुई 46.3 फूट, इचलकरंजी 43 फूट, तेरवाड 40.6 फूट, शिरोळ 31.9 फूट, नृसिंहवाडी 28 फूट, राजापूर 18 फूट तर नजीकच्या सांगली 8.6 फूट आणि अंकली  7.10 फूट अशी आहे.

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.