** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, September 8, 2019

शिरोळमधील ४ गावातून ९७ तर करवीर मधील एका गावातून २५० कुटुंबांचे स्थलांतर




            कोल्हापूर, दि. ८ (जि.मा.का.) :खबरदारीचा उपाय म्हणून शिरोळमधील चार गावातील ९७ कुटुंबातील ३७५ व्यक्तींचे तर करवीर तालुक्यातील प्रयाग चिखलीमधील २५० कुटुंबातील ३९० जणांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.
            शिरोळ तालुक्यातील गोठणपूर (कुरुंदवाड) मधील ४, राजापूरमधील ४८, राजापूरवाडीमधील १८ व खिद्रापूरमधील २७ अशा ४ गावातून ९७ कुटुंबातील ३७५ व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये ११७ पुरुष, १४९ स्त्रीया आणि १०९ लहान मुलांचा समावेश आहे. त्याचबरोबरच ११६ जनावरांचेही स्थलांतर करण्यात आले आहे. 
            करवीर तालुक्यातील प्रयाग चिखली गावातील २५० कुटुंबातील ३९० व्यक्तींचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. यामध्ये ९० पुरुष, ३०० स्त्रीया यांचा समावेश आहे. त्याचबरोबर गावातील ४५० जनावरांचेही स्थलांतर झाले आहे.
0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.