** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, September 26, 2019

अलमट्टीमधून 57740 पाण्याचा विसर्ग जिल्हयात 9 बंधारे पाण्याखाली



 कोल्हापूर, दि. 26 (जिमाका) :  कोयनेतून 2100 तर अलमट्टीमधून 57740 पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज सकाळी 7 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी 20.6 फूट आहे. वारणा मोठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरला असून जिल्ह्यातील 9 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राधानगरी धरणात आज अखेर 8.18 टीएमसी पाणीसाठा आहे.
 पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ हे 7 बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील खडक कोगे हा 1 बंधारा पाण्याखाली आहे. कासारी नदीवरील - यवलूज हा 1 बंधारा पाण्याखाली आहे, असे एकूण 9 बंधारे पाण्याखाली आहेत.  नजिकच्या अलमट्टी धरणात 123.081 टीएमसी पाणी साठा आहे, तर कोयना धरणात 104.83  टीएमसी इतका पाणीसाठा आहे.
जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.45 टीएमसी, वारणा 34.40 टीएमसी, दूधगंगा 25.31 टीएमसी, कासारी 2.77 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 2.68 टीएमसी, पाटगाव 3.69 टीएमसी, चिकोत्रा 1.52, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 20.6 फूट, सुर्वे 20.6 फूट, रुई 51.6 फूट, इचलकरंजी 49.6 फूट, तेरवाड 43 फूट, शिरोळ 42.6 फूट, नृसिंहवाडी 43.6 फूट, राजापूर 33 फूट तर नजीकच्या सांगली 25.3 फूट अंकली 27.7 फूट अशी आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.