** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Sunday, September 8, 2019

राधानगरीतून 8540, कोयनेतून 70404 तर अलमट्टीमधून 182000 विसर्ग 67 बंधारे पाण्याखाली



           
कोल्हापूर, दि. 8 (जि.मा.का.) : राधानगरी धरणाचे 5 स्वयंचलित दरवाज्यामधून 8540, कोयनेतून 70404 तर अलमट्टीमधून 182000 पाण्याचा विसर्ग सुरु आहे. आज सकाळी 10 वाजता राजाराम बंधारा येथील पंचगंगेची पातळी 38.5 फूट इंच होती. जिल्ह्यातील 67 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.
राधानगरी धरणात आज अखेर 8.36 टीएमसी पाणीसाठा आहे.
            पंचगंगा नदीवरील- राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड, शिरोळ व शिंगणापूर हे 7 बंधारे पाण्याखाली आहेत. भोगावती नदीवरील राशिवडे, हळदी, सरकारी कोगे,  खडक कोगे व तारळे हे 5 बंधारे पाण्याखाली आहेत.  तुळशी नदीवरील बीड, आरे व बाचणी हे 3 बंधारे पाण्याखाली आहे. कासारी नदीवरील करंजफेण,  बाजारभोगाव,  वालोली, पुनाळ- तिरपण, ठाणे -आवळे व यवलुज  हे 6 बंधारे पाण्याखाली आहेत. कुंभी नदीवरील  शेणवडे, कळे (खा), वेतवडे, मांडुकली, सांगशी व कातळी हे 6 बंधारे पाण्याखाली आहेत. धामणी नदीवरील  सुळे व आंबर्डे हे 2 बंधारे पाण्याखाली आहेत. वारणा नदीवरील चिंचोली, माणगांव, कोडोली, चावरे, मांगले सावर्डे, तांदूळवाडी, शिगाव,  खोची व दानोळी  हे 9 बंधारे पाण्याखाली आहे. कडवी नदीवरील सवते सावर्डे, शिरगाव, कोपार्डे व बाचणी हे 4 बंधारे पाण्याखाली आहेत.  दूधगंगा नदीवरील दत्तवाड, सिंध्दनेर्ली, सुळकुड, बाचणी, कसबा वाळवे, तुरंबे आणि  सुळंबी हे 7 बंधारे पाण्याखाली आहेत.  वेदगंगा नदीवरील  कुरणी, सुरुपली  बस्तवडे,  गारगोटी, म्हसवे, निळपण, शेळोशी आणि वाघापूर  हे 8 बंधारे, हिरण्यकेशी नदीवरील खंदाळ, ऐनापूर, गिजवणे व निलजी हे 4 बंधारे पाण्याखाली आहेत. घटप्रभा नदीवरील तारेवाडी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे आणि आडकुर हे 4 बंधारे पाण्याखाली आहेत. ताम्रपर्णी नदीवरील कुर्तनवाडी व हल्लारवाडी असे एकूण 67 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. 
  जिल्ह्यातील धरणांमधून क्युसेकमधील होणारा  विसर्ग पुढीलप्रमाणे - वारणा- 13150, तुळसी- 1956, कुंभी-1850, कासारी-1100, दूधगंगा-13200 क्युसेक. 
00000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.