इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडु इच्छिणाऱ्या लोकांनी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये संपर्क करावा

 


कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत तंबाखू व तंबाखुजन्य पदार्थांचे व्यसन करणाऱ्या व्यक्तींना तंबाखूचे व्यसन सोडविण्यापासून परावृत्त करण्यासाठी समुपदेशन सत्रांचे आयोजन करण्यात येते. जिल्ह्यातील तंबाखूमुक्त शाळा या उपक्रमांतर्गत ९ निकषांची पुर्तता करून तंबाखूमुक्त शाळा करण्यासाठी प्रयत्न केले जातात. विद्यार्थ्यांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या दुष्परिणामापासून परावृत्त करण्यासाठी जनजागृतीपर विविध स्पर्धा जसे की, चित्रकला, निबंध, घोषवाक्य, कथाकथन, रांगोळी, भाषण इ. स्पर्धांचे आयोजन करून पात्र विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर बक्षिस वितरण केले जाते.                       

           विविध ठिकाणी लोकांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थाच्या व्यसनापासून परावृत्त करण्याकरिता विविध जनजागृतीपर तसेच प्रबोधनपर कार्यक्रम राबविले जातात. तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थ नियंत्रण कायदा (कोटपा २००३) अंतर्गत जिल्ह्यातील विविध ठिकाणी धाडी टाकून या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्न केले जातात.

         तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडू इच्छिणाऱ्या लोकांकरिता शासनामार्फत मोफत टोल फ्री नंबर ( १८००-११-२३५६) देण्यात आला आहे. या टोल फ्री नंबरवर तंबाखूचे व्यसन सोडण्याकरिता संपर्क करू शकतात. ज्या व्यक्ती या नंबरवर संपर्क करतील त्यांना दंडापासुन मुक्त करण्यात येईल. सेवा रुग्णालय, कसबा बावडा येथील मानसोपचार विभागामध्ये तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडु इच्छिणाऱ्या लोकांना मोफत समुपदेशन व आवश्यकतेनुसार औषधोपचार सेवा देण्यात येतील. तसेच पेस अॅकॅडमी, आर. के नगर व दि.कागल एज्युकेशन सोसायटी, कागल या शासकीय व्यसनमुक्ती केंद्रामध्ये तसेच  मनोबल, व्यसनमुक्ती केंद्र, मु.देवाळे, ता. करवीर व उमंग व्यसनमुक्ती व पुनर्वसन केंद्र, कसबा सांगाव, ता. कागल या खासगी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये संपर्क करू शकतात. या मोफत सेवेचा सर्वसामान्य जनतेने जास्तीत- जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कक्षाअंतर्गत करण्यात येत आहे.

          

 

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.