इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १७ जानेवारी, २०२२

उपवडे ल.पा. तलावामध्ये उपसाबंदी

 

 

 


कोल्हापूर, दि. 17 (जिमाका) : पंचगंगा पाटबंधारे उपविभाग, कोल्हापूर अंतर्गत उपवडे ल.पा. तलाव ता. करवीर येथील जलाशयातील पाण्यावर व डी.पी. वर शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसा बंदी करण्याचे आदेश पंचगंगा पाटबंधारे उपविभागाचे सहायक अभियंता संदिप दावणे यांनी दिले आहेत.

       उपसाबंदी उपसा कालावधीतील कार्यवाहीचा भाग उपवडे धरणाचा जलाशय व धरण पायथ्यापासून बोलोली को.प. बंधाऱ्यापर्यंत हरवळ नाल्यावर तसेच उपवडे जलाशयातून शेतीसाठी उपसा करणाऱ्या उपसा यंत्रावर उपसा बंदी कालावधी खालीलप्रमाणे आहे.

       उपवडे ल.पा. तलाव जलाशयात दि. 10 ते 21 जानेवारी - 12 दिवस, दि. 27 जानेवारी ते 7 फेब्रुवारी -12 दिवस, दि. 14 ते 25फेब्रुवारी -12 दिवस, दि. 3 ते 14 मार्च -12 दिवस व 20 मार्च ते पुढील आदेश होईपर्यंत राहील.

उपवडे धरणपायथ्यापासून ते बोलोली को.प. बंधाऱ्यापर्यंत दि. 21 ते 24 जानेवारी 4 दिवस, दि. 28 ते 31 जानेवारी 4 दिवस, 4 ते 7 फेब्रुवारी  4 दिवस, 11 ते 14 फेब्रुवारी 4 दिवस, 18 ते 21 फेब्रुवारी 4 दिवस, 25 ते 28 फेब्रुवारी 4 दिवस, 4 ते 7 मार्च 4 दिवस व 14 मार्च ते पुढील आदेशापर्यंत राहील.

जिल्ह्यातील वर नमुद केलेल्या उपसाबंदी अमंलात आणावयाच्या कार्यक्षेत्रातील विद्युत मंडळातील अधिकारी  व क्षेत्रीय कर्मचारी यांनी वर नमुद केलेल्या उपवडे ल.पा. तलाव येथील जलाशयातील सर्व तीरावर वर नमुद केलेल्या कालावधीसाठी शेतीसाठी पाणी उपसा करणाऱ्या विद्युत उपसायंत्राची तारामंडळे काढून घ्यावीत. तसेच महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी उपसा तेल यंत्रांना सिल करावे व उपसा बंदीची अंमलबजावणी काटेकोरपणे करावी.

           वरील कालावधीमध्ये पिण्याच्या पाणी पुरवठा व्यतिरिक्त इतर कारणासाठी (औद्योगिक व शेतीसाठी उपसाबंदी कालावधीत अनाधिकृत उपसा आढळून आल्यास संबंधित उपसायंत्र जप्त करून परवानाधारकाचा उपसा परवाना 1 वर्षाच्या कालावधीसाठी रद्द करण्यात येईल व होणाऱ्या नुकसानीस पाटबंधारे खाते जबाबदार राहणार नाही.)                                                                                                                                     

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.