इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, ३ जानेवारी, २०२२

15 ते 18 वर्ष वयोगटातील 9 हजार 318 विद्यार्थ्यांचे जिल्ह्यात लसीकरण

 





 

कोल्हापूर, दि.3 (जिमाका): कोरोना प्रादुर्भाव व ओमायक्रॉन विषाणू प्रतिबंधाच्या दृष्टीने आजपासून 15 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांना शाळा व महाविद्यालयाच्या ठिकाणी कोविड-19 लसीकरण करण्यात येत आहे. 15 ते 18 वर्ष वयोगटातील 9 हजार 318 विद्यार्थ्यांचे आज पहिल्या दिवशी जिल्ह्यात लसीकरण झाल्याची माहिती जिल्हा लसीकरण अधिकारी फारुख देसाई यांनी दिली.

विवेकानंद कॉलेज व कमला कॉलेज येथील लसीकरण केंद्रांना आज पालकमंत्री सतेज पाटील यांनी भेट देवून लस घेतलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

जिल्ह्यात आज अखेर 18 वर्षावरील 92 टक्के लाभार्थ्यांना पहिला डोस व 68 टक्के लाभार्थ्यांना दुसऱ्या डोसचे लसीकरण करण्यात आले आहे.

 कोल्हापूर जिल्ह्यात 15 ते 18 वर्षे वयोगटातील लाभार्थ्यांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी शहर व ग्रामीण भागातील शाळांमध्ये आजपासून लसीकरण सत्रे सुरू करण्यात आली असून सन 2007 पूर्वी जन्मलेले लाभार्थी लसीकरणास पात्र आहेत.

 

00000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.