इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

खत/किटकनाशक निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषि विस्तार सेवा पदविका अभ्यासक्रमासाठी प्रवेश सुरु

 

 

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका): निविष्ठा विक्रेत्यांसाठी कृषी विस्तार व्यवस्थापन संस्था (मैनेज) हैद्राबाद प्रमाणित कृषि विस्तार सेवा पदविका’ या ५२ आठवड्यांचा (आठवडयातून १ दिवस) प्रमाणपत्र अभ्यासक्रम प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्था (रामेती) येथे सुरू होत आहे. तरी इच्छुक खत व किटकनाशक निविष्ठा विक्रेते तसेच नवीन लायसन्स काढून विक्रेत्यांनी दि. 20 जानेवारीपर्यंत  दुपारी 4 वाजेपर्यंत अर्ज सादर करावा, असे आवाहन प्रादेशिक कृषी विस्तार व्यवस्थापन प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्यांनी केले आहे.

            अभ्यासक्रमासाठी  किमान पात्रता- इ. १० वी पास.   कोर्स फी- परवानाधारक निविष्ठा विक्रेत्यांसाठी 10 हजार रुपये व परवाना नसलेल्या प्रशिक्षणांर्थींसाठी 20 हजार रुपये. प्रशिक्षणार्थींची क्षमता- ४० (मर्यादित) प्रथम येणा-यास प्रथम प्राधान्य. कोर्स कालावधी - ४८ आठवडे (आठवडयातून १ दिवस).  वेळ-  सकाळी १० ते साय. ५ वाजेपर्यंत

            आवश्यक कागदपत्रे- विहीत नमुन्यातील अर्ज,  २फोटो,  शैक्षणिक अर्हता प्रमाणपत्राच्या छायांकित प्रती, निविष्ठा विक्री परवाना प्रमाणपत्र छायांकित प्रत व कोर्स फीच्या रकमेचा DD/NEFT/RTGS द्वारे बँक खात्यावरती जमा करावी व त्याची प्रत अर्जासोबत जोडावी.

बँकेचा तपशील- A/C Name- PRINCIPAL REGIONAL AGRIL EXT MANAGEMENT INSTITUTE KOLHAPUR

Bank-State Bank of India, Branch- Kolhapur Treasury, Kolhapur

IFC Code SBIN0007249, Account No-32549887057

 संपर्क -९९७५०३९१६1, ९९२११९२६९४, ९४०४९५४४०९

            कोल्हापूर, सांगली व सातारा जिल्ह्यातीलच खत/किटकनाशक निविष्ठा विक्रेत्यांनी अर्ज करावेत. प्रवेश घेऊ इच्छिणा-या उमेदवारांनी प्रथम सोबतच्या गुगल फॉर्म मध्ये आपली माहीती भरावी.

            विहित पात्रता धारण न करणा-या रासायनिक खते/किटकनाशके विक्रेत्यांना परवाना नुतनीकरणामध्ये तांत्रिक ज्ञानाअभावी अडचण असल्याने अशा विक्रेत्यांना प्रथम प्राधान्य राहील. संस्थेस प्राप्त होणारे अर्ज प्रवेश उपलब्ध क्षमतेनुसार अभ्यासक्रमास प्रवेश निश्चित करण्याचे अंतिम अधिकार संस्थेकडे राहतील.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.