कोल्हापूर, दि.
26 (जिल्हा माहिती कार्यालय): भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या 72 व्या वर्धापन
दिनानिमित्त मध्यवर्ती प्रशासकीय इमारतीमध्ये उपविभागीय अधिकारी सुशांत बनसोडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात
आले.
ध्वजारोहणाच्या
कार्यक्रमास सहकार न्यायालयाच्या न्यायाधीश अनुसया पाटील, स्वाती पाटील, राज्य गुप्त
विभागाचे अपर उपायुक्त उमेश हजारे, मुख्य गुप्तवार्ता अधिकारी सचिन पाटील, नायब
तहसिलदार मनोजकुमार ऐतवडे यांच्यासह प्रशासकीय इमारतीतील अधिकारी-कर्मचारी उपस्थित
होते.
000000
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.