इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

गुरुवार, १३ जानेवारी, २०२२

दिव्यांग क्षेत्रात कार्यरत व्यक्ती व संस्थांचा जिल्हा परिषदेच्या वतीने गौरव

 




कोल्हापूर, दि. 13 (जिमाका) :  जिल्हयातील दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या 20 दिव्यांग व्यक्ती व 9 संस्थांचा जिल्हा परिषदेच्यावतीने शुभेच्छापत्र व ‘दिव्यांग व्यक्ती अधिनियम 2016’ हे मराठी अनुवादित पुस्तक देऊन जिल्हा परिषदेच्या छत्रपती शाहू सभागृहामध्ये सत्कार करण्यात आला. तसेच त्यांना भविष्यात दिव्यांग क्षेत्रात केल्या जाणाऱ्या कामकाजासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

 "जिल्हा परिषदेने दिव्यांगांप्रती कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान करणे हे आपले कर्तव्य आहे. दिव्यांग क्षेत्रात कार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांना पुढील कामकाजासाठी शुभेच्छा व्यक्त करून जिल्हा परिषद कायम त्यांच्या पाठीशी राहिल" असे आश्वासन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहूल पाटील यांनी  केले.

जिल्हा परिषद प्रशासन दिव्यांगांच्या उन्नतीसाठी कटिबध्द राहिल" अशी ग्वाही जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिली.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकामध्ये यावर्षीपासून दिव्यांग शाळांना प्रवर्ग निहाय वेगवेगळे साहित्य देण्यात येणार आहे. तसेच कोरोना व महापूराच्या काळामध्ये सर्व ग्रामीण भागातील दिव्यांगांना प्रत्येकी 500  रुपये सानुग्रह अनुदान वाटप करण्यात आले आहे.

कार्यक्रमास जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जयवंत शिंपी, समाजकल्याण समिती सभापती कोमल मिसाळ, महिला व बालकल्याण समिती सभापती शिवानी भोसले तसेच अरुण इंगवले, विनय पाटील, सुभाष सातपुते, मनिषा माने, परवीन पटेल, स्वाती सासणे उपस्थित होते.

प्रास्ताविक मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी तर कार्यक्रमाचे आभार जिल्हा समाज कल्याण अधिकारी दीपक घाटे यांनी मानले.

0000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.