इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

राधानगरी प्रकल्पाचे दुरुस्ती करण्याचे नियोजन

 


कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : राधानगरी प्रकल्पाचे बांधकाम ब्रिटीशकालीन असून सद्यस्थितीत त्याला ७५ वर्षे पूर्ण होत आहेत. धरणाचे बांधकाम दगडी आहे. प्रकल्पावर असलेली ( सेवाद्वारे / आपतकालीन द्वार / स्वयंचलित द्वारे ) ही ब्रिटीशकालीन काळातील आहेत. सद्यस्थितीत सिंचनाकरिता तीन सर्व्हिस गेट असून वीज निर्मिती प्रकल्पाकरिता दोन सर्व्हिस गेट कार्यरत आहेत.

सद्यस्थितीत सर्व्हिस गेट परिचलनामध्ये वारंवार अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे सर्व्हिस गेटची दुरुस्ती करणे आवश्यक आहे. सर्व्हिस गेटची दुरुस्ती व त्यासाठी हायड्रॉलीक हॉईस्टचे संकल्पन करण्याचे काम प्रगतीपथावर असून यास मु.अ. (स्था), मु.अ. (यां) व मध्यवर्ती संकल्पचित्र संघटना (CDO) नाशिक त्यांच्या मान्यतेनंतर प्रत्यक्ष सर्व काम पूर्ण करण्यासाठी साधारणपणे एप्रिल पर्यंत कालावधी अपेक्षित आहे. ही कार्यवाही मंडळाअंतर्गत कार्यकारी अभियंता यांत्रिकी विभाग कोल्हापूर यांच्या मार्फत करण्यात येत आहे. या सर्व कामासाठी (एका द्वाराकरिता) निधीची तरतुद करण्यात आलेली आहे.

यांत्रिकी मंडळ कार्यालयाचे अधीक्षक अभियंता यांनी नियोजन केले आहे, अशी माहिती यांत्रिकी मंडळाचे उपअधीक्षकांनी दिली आहे.

000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.