इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

सोमवार, १७ जानेवारी, २०२२

नव्‍याने नाव नोंदणी केलेल्‍या युवा मतदारांनी PVC मतदार छायाचित्र ओळखपत्र प्राप्‍त करुन घ्‍यावे

 

 


 

कोल्हापूर, दि. 17 (जिमाका): कोविड 19 च्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाकडून निर्गमीत केलेल्या निर्धारित मार्गदर्शक सुचनांनुसार ‘राष्‍ट्रीय मतदार दिवस’ दि. 25 जानेवारी 2022 रोजी  साजरा केला जाणार आहे.

या वर्षीच्या राष्ट्रीय मतदार दिनाची  थिम “सर्वसमावेशक, सुलभ आणि सहभागपुर्ण निवडणुका” ही आहे. कार्यक्रमाच्या अनुषंगाने माध्यमिक/उच्च माध्यमिक स्तरावर निबंध व वक्तृत्व स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत. स्पर्धेमध्ये प्रथम तीन विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात येणार असून मतदान प्रक्रियेत भाग घेतलेल्या पाच दिव्यांग मतदारांनाही गौरविण्यात येणार आहे.  कार्यक्रमाचे औचित्य साधून जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर यांच्यामार्फत समाजातील वंचित घटक असलेल्या पाच तृतीय पंथीयांना EPIC वाटप करण्यात येणार आहे. 

तालुक्यातील प्रत्येक मतदान केंद्रावर नव्‍याने नाव नोंदणी केलेल्‍या युवा मतदारांना मतदान केंद्रस्‍तरीय अधिकारी (बी.एल.ओ.) यांच्या मार्फत समारंभपूर्वक PVC मतदार छायाचित्र ओळखपत्र दिले जाणार आहेत. नव्‍याने नाव नोंदणी केलेल्‍या मतदारांना e-EPIC देखील उपलब्ध करुन दिले जाणार आहे. याकरिता दिनांक 25 जानेवारी 2022 रोजी आपल्या मतदान केंद्रावर उपस्थित राहून आपले PVC मतदार छायाचित्र ओळखपत्र प्राप्‍त करुन घ्‍यावे, असे आवाहन जिल्‍हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे यांनी केले आहे.                                       

000000

 

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.