कोल्हापूर, दि. 19 (जिमाका): राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांअंतर्गत
तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडू इच्छिणाऱ्या लोकांसाठी शासनामार्फत 1800112356
हा विनाशुल्क टोल फ्री क्रमांक देण्यात आला आहे. तंबाखू सोडण्यासाठी इच्छुकांनी या
टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अनिल माळी
यांनी केले आहे.
ज्या व्यक्ती या क्रमांकावर संपर्क करतील त्यांना दंडापासून मुक्त
करण्यात येईल व सेवा रुग्णालय, कसबा बावडा येथील मानसोपचार विभागामध्ये तंबाखू व
तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन सोडू इच्छित लोकांना मोफत समुपदेशन व आवश्यकतेनुसार औषधोपचार
सेवा देण्यात येतील. तसेच पेस ॲकॅडमी, आर.के.नगर, दि. कागल एज्युकेशन सोसायटी,
कागल, मनोबल व्यसनमुक्ती केंद्र, मु. देवाळे, ता. करवीर व उमंग व्यसनमुक्ती व पुर्नवसन
केंद्र कसबा सांगाव, ता. कागल या खासगी व्यसनमुक्ती केंद्रामध्ये संपर्क करु शकतात.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.