कोल्हापूर, दि. 18 (जिमाका): कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निवृत्तीवेतन
धारकांना/ कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना कोषागार कार्यालयात गर्दी न करण्याचे
आवाहन कोषागार अधिकारी महेशकुमार कारंडे यांनी केले आहे.
जिल्हा कोषागार कार्यालयामध्ये निवृत्तीवेतनाच्या आवश्यक
कामकाजाकरिता प्रत्यक्ष न येता दूरध्वनी व ई-मेल आयडीव्दारे संपर्क साधल्यास
शंकाचे निरसण करण्यात येईल, असेही श्री. कारंडे यांनी पत्रकाव्दारे कळविले आहे.
दूरध्वनी क्र. 0231-2640087 व 0231-2644407
ई-मेल- kolhapur@zillamahakosh.in
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.