इंडिया ई च्या Dictionary मध्ये जिमाका चा ब्लॉग

मंगळवार, ११ जानेवारी, २०२२

रुग्णालयांना प्रशिक्षित मनुष्यबळाचा तुटवडा भासल्यास जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राशी संपर्क साधावा

 

कोल्हापूर, दि. 11 (जिमाका) : जिल्ह्यातील विविध रुग्णालयांना पॅरामेडिकल, नर्सिंग, डोमेस्टिक हेल्थकेअर वर्कर  प्रशिक्षित मनुष्यबळाचा तुटवडा भासल्यास कौशल्य विकास मार्फत प्रशिक्षित उमेदवारांना रोजगाराची संधी द्यावी, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शनकेंद्राचे सहायक आयुक्त संजय माळी यांनी केले आहे.  

जिल्ह्यात ऑक्सिजन प्लांट हाताळण्यासाठी कौशल्य युक्त मनुष्यबळ निर्माण करण्याच्या उद्देशाने कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता विभागाच्या संकल्प योजनेंतर्गत  18 ते 45 वयोगटातील बेरोजगार युवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. प्रशिक्षित मनुष्यबळ उभारणीसाठी राजर्षी छत्रपती शाहू महाराज वैद्यकीय महाविद्यालयात दिनांक 13 डिसेंबर 2021 पासून 30 प्रशिक्षणार्थींसाठी ऑक्सिजन हाताळणी अभ्यासक्रम सुरु करण्यात आला आहे. एक महिन्याचा अभ्यासक्रम असून संभाव्य परिस्थितीत मुलांनी अभ्यासक्रम तातडीने पूर्ण करून जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात उभारण्यात आलेल्या ऑक्सिजन प्लांटच्या व्यवस्थापनात सहभागी व्हावे.

जिल्ह्यामध्ये मुख्यमंत्री महा आरोग्य कौशल्य प्रशिक्षण कार्यक्रम अंतर्गत 600  प्रधानमंत्री कौशल्य विकास योजना 3.0 (सी.सी.सी.पी.) अंतर्गत  490 प्रशिक्षणार्थी आरोग्य क्षेत्रातील पॅरामेडिकल, नर्सिंग, डोमेस्टिक हेल्थकेअर वर्कर अभ्यासक्रमाचे प्रशिक्षण घेत असून लवकरच त्यांचे प्रशिक्षण पूर्ण होत आहे.

 अधिक माहितीकरिता जिल्हा कौशल्य विकास, रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या 0231-2545677 या दूरध्वनी क्रमांकवर किंवा kolhapurrojgar@gmail.com या मेलवर संपर्क साधावा, असे आवाहनही श्री. माळी यांनी केले आहे.

 

00000000

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

टीप: केवळ या ब्लॉगचे सदस्य टिप्पणी पोस्ट करू शकतात.