राज्य नाट्य
स्पर्धेच्या प्रवेशिकेसाठी
31 ऑगस्टपर्यंत मुदत
कोल्हापूर - 02 (जिमाका) : राज्य शासनाच्या सांस्कृतिककार्य संचालनालयाच्या वतीने दि. 15 नोव्हेंबर
2019 पासून सुरु होणाऱ्या राज्य नाट्य स्पर्धांसाठी हौशी नाट्य संस्थांकडून दिनांक
1 ते 31 ऑगस्ट पर्यंत प्रवेशिका अर्ज मागविण्यात येत आहेत.
59 व्या हौशी मराठी नाट्य स्पर्धेची
प्राथमिक फेरी दिनांक 15 नोव्हेंबर, 2019 पासून महाराष्ट्र राज्यातील विविध
स्पर्धा केंद्रांवर आयोजित करण्यात येणार आहे. तसेच 59 व्या महाराष्ट्र राज्य हौशी
हिंदी, संगीत व संस्कृत नाट्य स्पर्धांची अंतिम फेरी जानेवारी 2020 पासून
प्रत्येकी एका केंद्रावर आयोजित करण्यात येणार आहे.
नाट्य
स्पर्धेकरीता 3 हजार रुपये इतक्या अनामत रकमेचा धनाकर्ष स्पर्धक संस्थेने संचालक,
सांस्कृतिक कार्य, संचालनालय महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे नावे पाठविण्यात यावा.
नाट्य प्रयोग सादर केल्यानंतर त्याच रकमेचा धनाकर्ष (डीडी) संस्थांना परत करण्यात
येणार आहे. नोंदणीकृत हौशी नाट्य संस्थांना तसेच गतवर्षी राज्यनाटय स्पर्धेत
सहभागी झालेल्या नाट्य संस्थांना स्पर्धेसाठी विहित नमुन्यातील प्रवेशिका, नियम
संचालनालयाच्या www.mahasanskruti.org
या संकेत स्थळावर उपलब्ध करण्यात आलेला आहे. आवश्यक त्या कागदपत्रासह प्रवेशिका
दि. 31 ऑगस्ट, 2019 पर्यंत खालील पत्त्यावर सादर कराव्यात.
1)
मुंबई, कोकण व नाशिक विभागातील संस्थांनी संचालक,
सांस्कृतिक कार्य संचालनालय, जुने सचिवालय, विस्तार भवन, पहिला मजला, महात्मा
गांधी मार्ग, मुंबई-32 (022-22043550) या पत्त्यावर प्रवेशिका सादर करावी.
2)
पुणे महसूल विभागातील संस्थांनी, सहाय्यक संचालक,
सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, बंगला क्रमांक-4, विमानतळ रोड,
पुणे (7588091301) या पत्त्यावर प्रवेशिका पाठविण्यात यावी.
3)
औरंगाबाद महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक संचालक,
सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, रुम नंबर-02, एमटीडीसी बिल्डिंग,
गोल्डी टॉकीजच्या समोर, स्टेशन रोड, औंरगाबाद-431005 (0240-2339055) या पत्त्यावर
प्रवेशिका पाठवाव्यात.
4)
नागपूर व अमरावती महसूल विभागातील संस्थांनी सहाय्यक
संचालक, सांस्कृतिक कार्य संचालनालय, विभागीय कार्यालय, द्वारा : अभिरक्षक,
मध्यवर्ती संग्रहालय, अस्थायी प्रदर्शन हॉल, तळमजला, सिव्हिल लाईन, नागपूर-440001
(0712-2554211) या पत्त्यावर प्रवेशिका पाठवावी.
विहित मुदतीनंतर प्राप्त होणाऱ्या प्रवेशिका
स्विकारल्या जाणार नाहीत. प्रवेशिकेसोबत आवश्यक असणारी कागदपत्रे जोडलेली नसल्यास किंवा संपूर्ण तपशिल भरला नसल्यास प्रवेशिका
अपात्र ठरविण्यात येईल. प्रवेशिकेतील त्रुटींच्या संदर्भात कोणताही पत्रव्यवहार
केला जाणार नाही, याची सर्व स्पर्धक संस्थांनी नोंद घेण्यात यावी.
स्पर्धेसाठी संस्थेची निवड झाल्यानंतर संस्थेने
शासनाने निश्चित केलेल्या केंद्रावर व दिलेल्या तारखेस प्रयोग सादर केला नाही, तर
त्यांची प्रवेशिकेसोबत भरलेली अनामत रक्कम शासकीय कोषागारात जमा करण्यात येईल.
नाट्यस्पर्धेकरीता संस्थांना शासन नियम बंधनकारक राहतील. नियमांचे उल्लंघन केल्यास
संस्थेला अपात्र ठरविण्यात येईल, असे सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक
श्रीमती मीनल जोगळेकर यांनी कळविले आहे.
000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.