पूरग्रस्त
भागातील शाळांना सुट्टी द्या; जिल्हाधिकाऱ्यांचे शिक्षणाधिकाऱ्यांना निर्देश
कोल्हापूर - 02 (जिमाका)
: जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होवून अनेक ठिकाणी
रस्ते बंद झाले आहेत विद्यार्थ्यांना शाळेत जाणे शक्य नाही, अशा शाळांना सुट्टी
जाहीर करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी प्राथमिक आणि माध्यमिक
शिक्षणाधिकाऱ्यांना आज दिले.
आपत्कालीन परिस्थितीत शाळांना सुट्टी देण्याचे
अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना देण्याचा निर्णय आजच शालेय शिक्षणमंत्री ॲड आशिष शेलार यांनी घेतला आहे.
पंचगंगा नदीने धोक्याची
पातळी ओलांडली आहे. अनेक ठिकाणी रस्ते बंद आहेत. पूरग्रस्त नागरिकांच्या निवासाची
सोय ज्या शाळेत केली असेल, अशा शाळेतील मुख्याध्यापकांनी आपल्या अधिकारात शाळांना
सुट्टी द्यावी, असेही जिल्हाधिकारी श्री. देसाई यांनी निर्देश दिले आहेत.
0000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.