** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, August 3, 2019

राधानगरीच्या चार दरवाज्यातून 7112 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग



`              कोल्हापूर, दि. 3 (जि.मा.का.) : राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे क्रमांक 3,4,5 व 6 सुरू आहेत. यामधून 7112 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे, अशी माहिती पंचगंगा पाटबंधारे विभाग तथा पूर नियंत्रण कक्षाचे समन्वय अधिकारी एस.एम.शिंदे यांनी दिली आहे.
                पंचगंगा नदीची राजाराम बंधाऱ्याजवळील पाणी पातळी आज सकाळी 7 वाजता 43 फूट 8 इंच असून एकूण 81 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. राधानगरी धरणात आज अखेर 8.34  टीएमसी पाणीसाठा आहे. कोदे लघुप्रकल्प व जांबरे मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरलेला आहे.
           पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ. भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे, सरकारी कोगे, खडक कोगे, शिरगाव व तारळे. कासारी नदीवरील- बाजारभोगाव, वालोली, ठाणे-आळवे, पुनाळ-तिरपन, यवलूज, कांटे, करंजफेन व पेंडाखळे. तुळशी नदीवरील- बीड, आरे व बाचणी. वारणा नदीवरील- चिंचोली, माणगाव, कोडोली, चावरे, मांगलेसावर्डे, तांदुळवाडी, शिगांव, खोची व दानोळी. कडवी नदीवरील- सवतेसावर्डे, शिरगाव, पाटणे, सुतारवाडी, वालूर, भोसलेवाडी, येलूर व कोपार्डे. दुधगंगा नदीवरील- दत्तवाड, सिद्धनेर्ली, सुळकुड व बाचणी. कुंभी नदीवरील- शेनवडे, कळे (खा), वेतवडे व मांडूकली. वेदगंगा नदीवरील- कुरणी, सुरुपली, बस्तवडे, गारगोटी, म्हसवे, निळपण, वाघापूर, शेणगाव व चिखली. हिरण्यकेशी नदीवरील- साळगाव, ऐणापूर, गिजवणे, जरळी, खंदाळ व निलजी. घटप्रभा नदीवरील- बिजूर भोगाली, पिळणी, हिंडगाव गवसे, कानडे सावर्डे, आडकूर, कानडेवाडी व तारेवाडी. ताम्रपणी नदीवरील- कुर्तनवाडी, चंदगड व हल्लारवाडी. शाळी नदीवरील- येळावणे, कोळगाव व टेकोली.  धामणी नदीवरील- सुळे, आंबर्डे, पनोरे व गवसी असे एकूण 81 बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 88.02  टीएमसी तर अल्लमट्टी धरणात  102.262  इतका पाणीसाठा आहे.
            जिल्ह्यातील धरणांमध्ये  पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 3.03  टीएमसी, वारणा 31.78 टीएमसी, दूधगंगा 18.81 टीएमसी, कासारी 2.38 टीएमसी, कडवी 2.52 टीएमसी, कुंभी 250 टीएमसी, पाटगाव 3.20 टीएमसी, 1.12 टीएमसी, चित्री 1.88 टीएमसी, जंगमहट्टी 1.22 टीएमसी, घटप्रभा  1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, कोदे (ल. पा.) 0.21 टीएमसी असा आहे.
            बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 43.8 फूट, सुर्वे 41.5 फूट, रुई 71.6 फूट, इचलकरंजी 67 फूट, तेरवाड 63 फूट, शिरोळ 60.6 फूट, नृसिंहवाडी 60 फूट, राजापूर 47.9  फूट तर नजीकच्या सांगली  36.7 फूट आणि अंकली  41.4  फूट अशी आहे.
000000


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.