** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 2, 2019

सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाकडून गणेशोत्सव मंडळांची नोंदणी सुरू



कोल्हापूर, दि. 2 (जि.मा.का.) : सार्वजनिक कार्य, उत्सव करणाऱ्या संस्था, मंडळे उत्सव समित्या यांना वर्गणी परवाना सुलभरित्या मिळण्याकरिता तालुकानिहाय न्यायिक अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. अशी माहिती सार्वजनिक न्यास नोंदणी अधिक्षकांनी दिली आहे.
                हातकणंगले, शाहूवाडी, आजरा, गडहिंग्लज, चंदगड व राधानगरी तालुक्यासाठी श्रीमती रू.र.कोरे (सहाय्यक धर्मादाय आयुक्त-1). करवीर, शिरोळ, पन्हाळा,गगनबावडा व कागल तालुक्यासाठी रा.दौ. वाबळे (सहाय्यक धर्मादाय आयुक्त-3).
           अधिक माहिती संकेतस्थळावरील प्रणाली मार्गदर्शनमध्ये उपलब्ध आहे. अर्ज भरण्यासाठी पुढील कागदपत्रांची आवश्यकता आहे.
          सर्व सदस्य व पदाधिकारी यांचे पॅनकार्ड तसेच ओळखपत्र (आधारकार्ड,निवडणूक ओळखपत्र,वाहन चालक परवाना) मागील वर्षाचे हिशोब आणि वर्षाचे अंदाजपत्रक (उत्सवाचा खर्च 5 हजार पेक्षा जास्त असल्यास सनदी लेखापालांकडून तयार करून घ्यावेत.) कार्यालयामार्फत देण्यात आलेल्या परवानगरीची प्रत (मागील वर्षी परवानगी घेतली असल्यास)व या वर्षापासून नव्याने कार्य,उत्सव साजरे करीत असल्यास नगरपालिका हद्दीतील मंडळांनी त्यांचे भागातील नगरसेवकांचे (प्रथम वर्ष उत्सव साजरा करीत असल्याबाबतचे) शिफारसपत्र व ग्रामीण भागातील असल्यास संबंधित ग्रामपंचायतीचे वरील आशयाचे शिफारसपत्र जोडणे आवश्यक आहे.
          महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम 1950 चे कलम 41 क अन्वये असणारी चौकशी ही न्यायीक स्वरूपाची असल्यामुळे अर्ज योग्यरीतीने करण्याची जाबाबदारी अर्जदाराची आहे. न्यायीक चौकशीमधील मा.स.ध.आ. यांचे आदेश पारित झाल्यानंतरच परवानगी देण्यात येते. संबंधितांनी लवकरात-लवकर म.सा.वि.व्य.अधिनियम 1950 चे कलम 41 क नुसार तात्पुरत्या परवानगरीसाठी अर्ज दाखल करावेत.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.