** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 2, 2019

अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिकांना विशेष गौरव पुरस्कार



कोल्हापूर, दि. 2 (जि.मा.का.) : विविध क्षेत्रांमध्ये अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक/पती/पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी सुभाष सासने यांनी दिली.
विविध क्षेत्रांमध्ये राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय पातळीवर खेळातील पुरस्कार प्राप्त खेळाडू, साहित्य, संगीत, गायन, नृत्य, वादन क्षेत्रातील पुरस्कार विजेते, यशस्वी उद्योजकांचा पुरस्कार मिळविणारे, संगणक क्षेत्रात अतिउत्कृष्ट कामगिरी करणारे, पुर/जळीत/दरोडा/अपघात अगर इतर नैसर्गिक आपत्तीमध्ये बहुमोल कामगिरी करणारे, शैक्षणिक क्षेत्रामध्ये इयत्ता 10 वी तसेच 12 वी च्या परीक्षेमध्ये 90 टक्क्यापेक्षा जास्त गुण मिळवून उत्तीर्ण किंवा पदव्युत्तर परीक्षेध्ये विद्यापीठात सर्वप्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या माजी सैनिक, पती, पाल्य यांना त्यांच्या कार्याबद्दल धनराशी, पुरस्कार, सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सन्मानित करण्यात येणार आहे.
माजी सैनिकांनी संबंधित कार्याबद्दलची प्रमाणपत्रे, गुणपत्रे, सैन्य सेवा पुस्तक, ओळखपत्रासह दिनांक 10 सप्टेंबर पूर्वी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात सादर करावीत. अधिक माहितीसाठी दूरध्वनी क्रमांक 0231-2665812 संपर्क साधावा.
00000




No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.