** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, August 2, 2019

अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील सात एसटी महामार्ग बंद - राज्य परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे



कोल्हापूर, दि. 2 (जि.मा.का.) : अतिवृष्टीमुळे संभाजीनगर-बाचणी, गडहिंग्लज -नांगनुर, गारगोटी किल्ला -मूरगुड मार्ग, चंदगड- दोडामार्ग तिलारी, कुरूंदवाड- बस्तवाड, गगनबावडा-कोल्हापूर आणि आजरा-चंदगड हे सात मार्ग पूर्णत: बंद करण्यात आल्याची माहिती राज्य परिवहन विभाग नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.
       कोल्हापूर -गगनबावडा मार्गावर शिवाजी पूल ते केर्ली येथे पाणी आल्याने राधानगरीमार्गे पर्यायी मार्ग चालू आहे. इचलकरंजी- कागल- रेंदाळ मार्गावर रस्त्यावर पाणी आल्याने हा पर्यायी बोरगाव मार्गे सुरू आहे. मलकापूर -गावडी हा अंशत: बंद आहे. कागल- बस्तवडे -बाणगे मार्गावर पाणी असल्याने पर्यायी मुरगूड -अनूर मार्गे एसटी वाहतूक सुरू आहे.
000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.