कोल्हापूर, दि. 2 (जि.मा.का.) : अतिवृष्टीमुळे कोल्हापूर-
गगनबावडा, गडहिंग्लज -नांगनुर, चंदगड- आजरा, कुरूंदवाड -बस्तवाड, दानोळी- कवठेसार,
कागल -बस्तवडे, कागल- बाणगे, गगनबावडा- कोल्हापूर आणि आजरा -चंदगड या नऊ
मार्गावरील एसटी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे, अशी माहिती परिवहन विभाग
नियंत्रक रोहन पलंगे यांनी दिली.
कोल्हापूर -रत्नागिरी मार्गावर केर्ली रस्त्यावर पाणी आल्याने वाठार
बोरपाडळेमार्गे पर्यायी मार्ग चालू आहे. संभाजीनगर-
राधानगरी मार्गावर हळदी येथे रस्त्यावर पाणी आल्याने कुर्डू शेळेवाडीमार्गे वाहतूक
सुरू आहे. इचलकरंजी- कागल- मार्गावर माणकापूर
येथे पाणी आल्याने पर्यायी पाचमैल मार्गे वाहतूक सुरू आहे. इचलकरंजी-नृसिंहवाडी
मार्गावर शिरढोण पुलावर पाणी आल्याने शिरढोणपर्यंत वाहतूक सुरू आहे. इचलकरंजी
नृसिंहवाडी मार्गावर लाट- हेरवाड पुलावर पाणी आल्याने पर्यायी पाच मैल मार्गे
वाहतूक सुरू. गारगोटी-किल्ला पाल मार्गावर रस्ता खराब झाल्याने पर्यायी मालवाडी
मार्गे वाहतूक सुरू आहे.मलकापूर -गावडी मार्ग अंशत: बंद आहे. मलकापूर-कोल्हापूर
मार्गावर केर्ली रस्त्यावर पाणी आल्याने वाठार-बोरपाडळेमार्गे वाहतूक सुरू आहे.
कुरूंदवाड-लाट-हेरवाड मार्गावर हेरवाड
येथे पुलावर पाणी आल्याने पाच मैलमार्गे वाहतूक सुरू आहे. कुरूंदवाड-टाकळे दानवाड
मार्गावर दानवाड ओढ्यावर पाणी आल्याने दत्तवाडमार्गे वाहतूक सुरू आहे.
कुरूंदवाड-शिरोळ धरणगुत्ती मार्गावर धरणगुत्ती रस्यावर पाणी असल्याने इचलकरंजी/ जयसिंगपूरमार्गे
वाहतूक सुरू आहे. कुरूंदवाड-अकिवाट-राजापूर मार्गावर राजापूर पुलावर पाणी आल्याने
आकिवाट टाकळीमार्गे वाहतूक सुरू आहे. कागल- इचलकरंजी मार्गावर माणकापूर येथे पाणी
आल्याने हुपरीपर्यंत वाहतूक सुरू आहे. राधानगरी- काटीवडे मार्गावर पुलावर पाणी
असल्याने पर्यायी गुडाळमार्गे वाहतूक सुरू आहे.
.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.