** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, June 1, 2021

जिल्ह्यात CCC ठिकाणी भेटी देण्यासाठी अधिकाऱ्यांची नियुक्ती

 

 

कोल्हापूर, दि. 1 (जिमाका) :  जिल्ह्यात कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात CCC आणि DCHC या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देवून त्या ठिकाणी पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांचा दैनंदिन आढावा घेण्यासाठी उपजिल्हाधिकारी हेमंत निकम व श्रीमती हर्षला वेदक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या दोघांना अनुक्रमे सुनिल घाग व विनोद वस्त्रे हे या कामी मदत करतील.

या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास दोषींवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 तरतुदीनुसार व भा.दं. सं. 1860 (45) च्या कलम 188 अन्वये कारवाई करण्यात येईल असे जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रकान्वये स्पष्ट केले आहे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.