** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, October 1, 2020

अलमट्टीतून 38922 क्युसेक विसर्ग सुरू

 


          कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 232.43 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार अलमट्टी धरणातून 38922 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. जांबरे मध्यम प्रकल्प, जंगमहट्टी मध्यम प्रकल्प, दूधगंगा मोठा प्रकल्प व वारणा मोठा प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले आहेत.

पंचगंगा नदीवरील इचलकरंजी हा एक बंधारा पाण्याखाली आहे. नजिकच्या कोयना धरणात 105.15 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 123.081 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 98.29 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 77.52 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 76.52 दलघमी, पाटगाव 104.57 दलघमी, चिकोत्रा 43.12 दलघमी, चित्री 53.30 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, घटप्रभा 42.85 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.06 दलघमी असा आहे.

          तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 12.3, सुर्वे 14 फूट, रुई 40.6 फूट, इचलकरंजी 37 फूट, तेरवाड 37 फूट, शिरोळ 29.6 फूट, नृसिंहवाडी 26.9 फूट, राजापूर 16.3 फूट तर नजीकच्या सांगली 7.9 फूट व अंकली  7.10 फूट अशी आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.