** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, October 1, 2020

ऑनलाईन प्रशिक्षणासाठी शिक्षकांनी नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 


कोल्हापूर, दि. 1 (जिल्हा माहिती कार्यालय): इ. 12 वी पुर्नरचित अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा व तद्अनुषांगिक बाबींसंदर्भात ऑनलाईन प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक/कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांनी 8 ऑक्टोबपर्यंत मंडळाच्या वेबसाईटवर ऑनलाईन नाव नोंदणी करावी, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव डॉ. अशोक भोसले यांनी केले आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळांतर्गत येणाऱ्या कनिष्ठ महाविद्यालयातील उच्च माध्यमिक शिक्षकांसाठी इ. 12 वी पुर्नरचित अभ्यासक्रमाचा मूल्यमापन आराखडा व तद्अनुषंगीक बाबींसंदर्भात सर्व विषयांचे ऑनलाईन प्रशिक्षण आयोजित करण्यात येणार आहे. सर्व शिक्षकांना प्रशिक्षण घेणे अनिवार्य असून प्रशिक्षणासाठी उच्च माध्यमिक / कनिष्ठ महाविद्यालयातील सर्व विषय शिक्षकांची evaluation.mh-hsc.ac.in या वेबसाईटवर दिलेल्या विहित प्रपत्रामध्ये आपली माहिती दि. 1 ते 8 ऑक्टोबर या कालावधीत ऑनलाईन नाव नोंदणी करून घेण्यात येत आहे. नावनोंदणीस दिलेल्या मुदतीनंतर लिंक बंद केली जाणार असल्याने शिक्षकांनी विहित मुदतीत आपल्या नावाची नोंदणी करावी.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.