** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, October 12, 2020

माझे कुटुंब माझी जबाबदारी आज 144862 नागरीकांचे सर्व्हेक्षण - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे

 


कोल्हापूर, दि. 12 (जिल्हा माहिती कार्यालय) : कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सुरु झालेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत  कुटुंब कल्याण केंद्राच्या माध्यमातून केलेल्या सर्व्हेक्षणाच्या आजच्यादिवशी 33975 घरांचे आणि 144862 इतक्या लोकांची  सर्व्हेक्षण करण्यात आले, असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. योगेश साळे यांनी दिली.

                 ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहीमेअंतर्गत आजच्या दिवशी तपासणी करण्यात आलेल्या तालुक्यातील नागरीकांची कुटुंब कल्याण केंद्र निहाय माहिती  आजरा 1387 घरांचे व 4973 नागरिकांचे, भुदरगड 6544 घरांचे व 22250 नागरिकांचे,  चंदगड 3285 घरांचे व 13470 नागरिकांचे,  हातकणंगले 6880 घरांचे व 32239 नागरिकांचे,  करवीर 4333 घरांचे व 19487 नागरिकांचे,  पन्हाळा 1884 घरांचे व 8513 नागरिकांचे, शाहूवाडी 992 घरांचे व 3947 नागरिकांचे  व शिरोळ- 3859 घरांचे व 17589 नागरिकांचे असे एकूण 29164 घरांचे व 122468 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

               नगरपंचायत हातकणंगले 468 घरांचे व 2017 नागरिकांचे, नगरपंचायत इचलकरंजी 3496 घरांचे व 16028 नागरिकांचे, नगरपंचायत पेठवडगाव  135 घरांचे व 670 नागरिकांचे तर नगरपंचायत हुपरी  712 घरांचे व 3679 नागरिकांचे, असे एकूण 4811 घरांचे व 22394 नागरिकांचे सर्व्हेक्षण करण्यात आले आहे.

000000

 

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.