** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, October 17, 2020

आजअखेर 43 हजार 309 जणांना डिस्चार्ज

 


   कोल्हापूर, दि. 17 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 314 प्राप्त अहवालापैकी 280 निगेटिव्ह तर 32 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (2 अहवाल नाकारण्यात आले) ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 141 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 129 तर 12 पॉझीटिव्ह, खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 211 प्राप्त अहवालापैकी 176 निगेटिव्ह तर 35 पॉझीटिव्ह  असे एकूण 79 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 47 हजार 290 पॉझीटिव्हपैकी 43 हजार 309 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 2 हजार 387 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 79 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-5,  चंदगड-3, गडहिंग्लज-3, हातकणंगले-11, कागल-1, करवीर-7, पन्हाळा-2, राधानगरी-2, शाहूवाडी-3, शिरोळ- 4, नगरपरिषद क्षेत्र-7, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 17 व इतर शहरे व राज्य 14 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-831, भुदरगड- 1183, चंदगड- 1141, गडहिंग्लज- 1353, गगनबावडा- 133, हातकणंगले-5139, कागल-1611, करवीर-5467, पन्हाळा- 1810, राधानगरी-1203, शाहूवाडी-1263, शिरोळ- 2417, नगरपरिषद क्षेत्र-7263, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 313 असे एकूण  45 हजार 127 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 163 असे मिळून एकूण 47  हजार 290 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 47 हजार 290 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 43 हजार 309 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 594 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 2 हजार 387 इतकी आहे.

000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.