** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, October 15, 2020

प्रमुख राज्य मार्ग बंद; पर्यायी मार्गाने वाहतूक सुरु

 


कोल्हापूर, दि. 15 (जिल्हा माहिती कार्यालय): जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे प्रमुख राज्य मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. पर्यायी मार्गाने वाहतूक वळविण्यात आली असल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.

करवीर तालुक्यातील  कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावर शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर पाणी आल्याने कोल्हापूर आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतूक सुरू.

00000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.