** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, October 14, 2020

आजअखेर 41 हजार 757 जणांना डिस्चार्ज

  

   कोल्हापूर, दि. 14 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 240 प्राप्त अहवालापैकी 219 निगेटिव्ह तर 18 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (3 अहवाल नाकारण्यात आले)  ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 208 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 184 तर 24 पॉझीटिव्ह, खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 363 प्राप्त अहवालापैकी 295 निगेटिव्ह तर 68 पॉझीटिव्ह  असे एकूण 110 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 47 हजार 58 पॉझीटिव्हपैकी 41 हजार 757 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 3 हजार 724 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 110 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-1, चंदगड-8, गडहिंग्लज-6, हातकणंगले- 9, कागल-5, करवीर-9, पन्हाळा-4, राधानगरी- 1, शाहूवाडी-8, शिरोळ-4, नगरपरिषद क्षेत्र-6, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 33 व इतर शहरे व राज्य 16 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-821, भुदरगड- 1179, चंदगड- 1131, गडहिंग्लज- 1348, गगनबावडा- 133, हातकणंगले-5109, कागल-1606, करवीर-5438, पन्हाळा- 1805, राधानगरी-1201, शाहूवाडी-1259, शिरोळ- 2409, नगरपरिषद क्षेत्र-7236, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 255 असे एकूण  44 हजार 930 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 128 असे मिळून एकूण 47  हजार 58  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 47 हजार 58 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 41 हजार 757 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 577 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 3 हजार 724 इतकी आहे.

0000000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.