** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, October 21, 2020

आजअखेर 43 हजार 982 जणांना डिस्चार्ज

 


 

   कोल्हापूर, दि. 21 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 704 प्राप्त अहवालापैकी 640 निगेटिव्ह तर 63 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (1 अहवाल नाकारण्यात आले) ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 141 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 134 तर 7 पॉझीटिव्ह, खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 256 प्राप्त अहवालापैकी 234 निगेटिव्ह (1 अहवाल नाकारण्यात आला) तर 21 पॉझीटिव्ह  असे एकूण 91 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 47 हजार 569 पॉझीटिव्हपैकी 43 हजार 982 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 1 हजार 973 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 91 पॉझीटिव्ह अहवालापैकी भुदरगड-2 चंदगड-2, गडहिंग्लज-7,  हातकणंगले-8, कागल-2, करवीर-8, पन्हाळा-6, राधानगरी-2, शाहूवाडी-2, शिरोळ-6 नगरपरिषद क्षेत्र-10, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 30 व इतर शहरे व राज्य 6 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-836, भुदरगड- 1188, चंदगड- 1148, गडहिंग्लज- 1370, गगनबावडा- 139, हातकणंगले-5162, कागल-1619, करवीर-5487, पन्हाळा- 1822, राधानगरी-1207, शाहूवाडी-1272, शिरोळ- 2428, नगरपरिषद क्षेत्र-7290, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 420 असे एकूण 45 हजार 388 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 181 असे मिळून एकूण 47  हजार 569 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 47 हजार 569 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 43 हजार 982 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 614 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 1 हजार 973 इतकी आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.