कोल्हापूर,
दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि
सीबीएनएएटी चाचणीचे 507 प्राप्त अहवालापैकी 474 निगेटिव्ह तर 29 अहवाल पॉझीटिव्ह
आहेत. (4 अहवाल नाकारण्यात आले) ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 143
प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 133 तर 10 पॉझीटिव्ह, खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 211
प्राप्त अहवालापैकी 166 निगेटिव्ह तर 45 पॉझीटिव्ह असे एकूण 84 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.
जिल्ह्यात
आजअखेर एकूण 47 हजार 211 पॉझीटिव्हपैकी 42 हजार 865 जणांना डिस्चार्ज देण्यात आला
आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 2 हजार 758 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.
आज
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 84 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-3, भुदरगड-4, चंदगड-2,
हातकणंगले-7, करवीर-16, पन्हाळा-1, शाहूवाडी-1, नगरपरिषद क्षेत्र-14, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र- 28 व इतर शहरे व राज्य 8 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका,
नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-826, भुदरगड- 1183,
चंदगड- 1138, गडहिंग्लज- 1350, गगनबावडा- 133, हातकणंगले-5128, कागल-1610,
करवीर-5460, पन्हाळा- 1808, राधानगरी-1201, शाहूवाडी-1260, शिरोळ- 2413, नगरपरिषद
क्षेत्र-7256, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 296 असे एकूण
45 हजार 62 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 149 असे मिळून एकूण 47
हजार 211 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 47 हजार 211 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी
42 हजार 865 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 588 जणांचा मृत्यू
झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 2
हजार 758 इतकी आहे.
000000
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.