** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, October 7, 2020

जिल्हा परिषदेची काम वाटप समिती सभा


कोल्हापूर, दि. 7 (जिल्हा माहिती कार्यालय) : जिल्ह्यातील फक्त जिल्हा परिषदेकडील सर्व नोंदणीकृत मजूर सह. संस्था/ सुशिक्षीत बेरोजगार (स्थापत्य) अभियंते/ सर्वसाधारण कंत्राटदार यांच्यासाठी कामवाटप समितीची बैठक गुरूवार दि. 8 ऑक्टोबर  रोजी दुपारी 2 वा. जिल्हा परिषद, जुने सभागृह (कागलकर हाऊस) येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कामवाटप समितीचे सदस्य सचिव यांनी दिली.

       जिल्ह्यातील जिल्हा परिषदेकडील सर्व नोंदणीकृत सुशिक्षीत बेरोजगार (स्थापत्य) अभियंते, मजूर सहकारी संस्था व सर्वसाधारण कंत्राटदार यांनी मिटींगला येताना ज्यांच्या नावे सुबेअ/ मजूर/ सर्वसाधारण वर्गातले जिल्हा परिषदेचे रजिस्ट्रेशन आहे त्यांनी स्वत: आपल्या पासबुकसह व मजूर संस्थांचे चेअरमन / सचिव यांनी आपल्या पासबुकसह हजर रहावे.

00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.