** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Tuesday, October 13, 2020

आजअखेर 41 हजार 280 जणांना डिस्चार्ज

 


 

   कोल्हापूर, दि. 13 (जिल्हा माहिती कार्यालय) : आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत आरटीपीसीआर आणि सीबीएनएएटी चाचणीचे 409 प्राप्त अहवालापैकी 380 निगेटिव्ह तर 28 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. (1 अहवाल दुसऱ्यांदा पॉझीटिव्ह)  ॲन्टीजेन टेस्टिंग चाचणीचे 233 प्राप्त अहवालापैकी निगेटिव्ह 208 तर 25 पॉझीटिव्ह (80 निगेटिव्ह अहवाल आरटीपीसीआरसाठी तपासणीसाठी पाठविले), खासगी रुग्णालये/लॅब मध्ये 84 प्राप्त अहवालापैकी 70 निगेटिव्ह तर 14 पॉझीटिव्ह  असे एकूण 67 अहवाल पॉझीटिव्ह आहेत.

जिल्ह्यात आजअखेर एकूण 46 हजार 984 पॉझीटिव्हपैकी 41 हजार 280 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 4 हजार 99 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत.

आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत प्राप्त 67 पॉझीटिव्ह अहवालापैकी आजरा-1, भुदरगड- 2, चंदगड-2, गगनबावडा-1, हातकणंगले- 3, करवीर-11, पन्हाळा-2, राधानगरी- 1, शिरोळ-4, नगरपरिषद क्षेत्र-8, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 27 व इतर शहरे व राज्य 5 असा समावेश आहे.

आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा-820, भुदरगड- 1179, चंदगड- 1123, गडहिंग्लज- 1342, गगनबावडा- 133, हातकणंगले-5100, कागल-1601, करवीर-5429, पन्हाळा- 1801, राधानगरी-1200, शाहूवाडी-1251, शिरोळ- 2405, नगरपरिषद क्षेत्र-7230, कोल्हापूर महापालिका क्षेत्र- 14 हजार 222 असे एकूण  44 हजार 836 आणि इतर जिल्हा व राज्यातील – 2 हजार 112 असे मिळून एकूण 46  हजार 948  रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.

            जिल्ह्यातील एकूण 46 हजार 948 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 41 हजार 280 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 1 हजार 569 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 4 हजार 99 इतकी आहे.

0000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.