** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Friday, October 16, 2020

16 बंधारे पाण्याखाली राधानगरीतून 4256; अलमट्टीतून 143653 क्युसेक विसर्ग सुरू

 


          कोल्हापूर, दि. 16 (जिल्हा माहिती कार्यालय) :  राधानगरी धरणात 233.94 दलघमी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 वा. च्या प्राप्त अहवालानुसार राधानगरीतून 4256, कोयनेतून 2100 तर अलमट्टी धरणातून 143653 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.

पंचगंगा नदीवरील -शिंगणापूर,राजाराम, सुर्वे, रूई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- हळदी, राशिवडे व खडक कोगे, कासारी नदीवरील -यवलूज, वारणा नदीवरील- चिंचोली, चावरे, कोडोली व तांदूळवाडी, दूधगंगा नदीवरील- दत्तवाड असे सोळा बंधारे पाण्याखाली आहेत. नजिकच्या कोयना धरणात 103.74 टीएमसी तर अल्लमट्टी धरणात 118.896 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. तुळशी 98.10 दलघमी, वारणा 974.19 दलघमी, दूधगंगा 719.12 दलघमी, कासारी 76.99 दलघमी, कडवी 71.24 दलघमी, कुंभी 76.52 दलघमी, पाटगाव 105.24 दलघमी, चिकोत्रा 43.12 दलघमी, चित्री 53.41 दलघमी, जंगमहट्टी 34.65 दलघमी, घटप्रभा 44.17 दलघमी, जांबरे 23.23 दलघमी, कोदे (ल. पा.) 6.06 दलघमी असा आहे.

            तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 26.1, सुर्वे 25.10 फूट, रुई 57 फूट, इचलकरंजी 56 फूट, तेरवाड 53 फूट, शिरोळ 53 फूट, नृसिंहवाडी 53.6 फूट, राजापूर 38 फूट तर नजीकच्या सांगली 35.6 फूट व अंकली 39 फूट अशी आहे.

000000

 

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.