कोल्हापूर,दि.
9 (जिल्हा माहिती कार्यालय): आजअखेर 687 रूग्णांपैकी 476 जणांना डिस्चार्ज देण्यात
आला आहे. आज सकाळी 10 वाजेपर्यंत 90 प्राप्त अवालापैकी 3 अहवाल पॉझीटिव्ह तर 87 अहवाल
निगेटिव्ह आले आहेत. आजअखेर जिल्ह्यात एकूण 203 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आज सकाळी 10
वाजेपर्यत प्राप्त 3 पॉझीटिव्ह अहवालामध्ये आजरा 2, गडहिंग्लज -1 असा समावेश आहे.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा
क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 74, भुदरगड- 68, चंदगड- 72,
गडहिंग्लज- 78, गगनबावडा- 6, हातकणंगले- 7, कागल- 56, करवीर- 14, पन्हाळा- 25,
राधानगरी- 63, शाहूवाडी- 174, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर
महापालिका क्षेत्र-24 असे एकूण 679 आणि पुणे -1,
सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि
आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 687 रुग्णांची आजअखेर
जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 687 रूग्णांपैकी
476 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर
एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील
रूग्णांची संख्या 203 इतकी आहे.
0 0 0 0 0 0
No comments:
Post a Comment
Note: Only a member of this blog may post a comment.