** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, June 25, 2020

अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाचे आज सेवा रुग्णालयात आयोजन



       कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): 26 जून जागतिक अंमली पदार्थ सेवन विरोधी दिनाचे औचित्य साधून मानसिक आरोग्य कार्यक्रमाअंतर्गत जिल्हा मानसिक आरोग्य कार्यक्रम कसबा बावडा येथील सेवा रूग्णालय येथे उद्या सकाळी 10.30 वाजता आयोजित केले आहे.
          मादक पदार्थांच्या तस्करी, व्यापार, तसेच सेवनामुळे आजची तरूण पिढी तसेच महाविद्यालयीन मुले केवळ जिज्ञासेपोटी अंमली पदार्थांची चव चाखून शेवटी व्यसनाच्या गर्तेत सापडत आहेत. याचे गांर्भीर्य यंत्रणेबरोबरच जनतेनेही लक्षात घ्यायला हवे. या कार्यक्रमास नागरिकांनी उपस्थित रहावे असे आवाहन सेवा रूग्णालय कोल्हापूर येथील मानसोपचार तज्ञ डॉ. अपर्णा कुलकर्णी यांनी केले आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.