** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, June 20, 2020

जिल्ह्यातील 2 मार्ग बंद



कोल्हापूर, दि. 20 (जि.मा.का.) : पावसामुळे जिल्ह्यातील राज्यमार्ग 1 व प्रमुख जिल्हा मार्ग 1 असे 2 मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहाय्यक अधीक्षक अभियंता श्रीधर घाटगे यांनी दिली.
करवीर तालुक्यातील कोल्हापूर शहराचा बाह्यवळण रस्ता कळंबे साळोखेनगर बालिंगे शिंगणापूर रामा-194 मार्गावरील शिंगणापूर केटीवेअर रस्त्यावर 1 फूट पाणी असल्याने वाहतुक बंद असून आंबेवाडी चिखली मार्गे पर्यायी वाहतुक सुरू आहे. 
कागल तालुक्यातील बिद्री सोनाळी-सावर्डे बु. गोरंबे आनूर बस्तवडे प्रजिमा क्र.46 मार्गावरील बस्तवडे बंधाऱ्यावर 1  फूट पाणी असल्याने या मार्गावरील वाहतुक बंद आहे. पर्यायी इजिमा क्र. 189 अनुर ते बानगे व इजिमा क्र. 93 बानगे मार्गे वाहतुक सुरू आहे.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.