** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, June 20, 2020

आजअखेर 676 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



       कोल्हापूर जिल्ह्यात,दि. 20 (जिल्हा माहिती कार्यालय): आज रात्री 8 वाजेपर्यंत 159 प्राप्त अवालापैकी 3 अहवाल पॉझीटिव्ह आले आहेत. जिल्ह्यात आजअखेर 734 रूग्णांपैकी 676 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 50 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
            आज रात्री 8 वाजेपर्यत वाजेपर्यत प्राप्त 3 पॉझीटिव्ह अहवाल हे भुदरगड -2, शिरोळ -1  तालुक्यातील आहे.
            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 76, भुदरगड- 73, चंदगड- 75, गडहिंग्लज- 86, गगनबावडा- 6, हातकणंगले- 11, कागल- 57, करवीर- 21, पन्हाळा- 27, राधानगरी- 68, शाहुवाडी- 180, शिरोळ- 8, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-26 असे एकूण 725 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-2, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 9 असे मिळून एकूण 734 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
            जिल्ह्यातील एकूण 734 रूग्णांपैकी 676 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 50 इतकी आहे.
0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.