** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, June 25, 2020

आजअखेर 710 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



       कोल्हापूर,दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी 10 वाजेपर्यंत 151 प्राप्त अहवालापैकी 144 निगेटिव्ह तर 6 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 765 पॉझीटिव्हपैकी 710 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. यामध्ये 1 अहवाल प्रलंबित आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 46 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
       आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 6 पॉझीटिव्ह अहवालामध्ये आजरा- 1, गडहिंग्लज- 2, शाहुवाडी- 2, नगरपरिषद क्षेत्रात -1 असा समावेश आहे.
            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 78, भुदरगड- 74, चंदगड- 78, गडहिंग्लज- 94, गगनबावडा- 6, हातकणंगले- 13, कागल- 57, करवीर- 22, पन्हाळा- 27, राधानगरी- 68, शाहुवाडी- 182, शिरोळ- 8, नगरपरिषद क्षेत्र- 16, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-31 असे एकूण 754 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-2, नाशिक -1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 11 असे मिळून एकूण 765 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
            जिल्ह्यातील एकूण 765 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 710 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 9 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 46 इतकी आहे.
0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.