** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, June 25, 2020

गृहमंत्री अनिल देशमुख जिल्हा दौऱ्यावर



            कोल्हापूर, दि. 25 (जिल्हा माहिती कार्यालय): गृहमंत्री अनिल देशमुख हे कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
          शनिवार, दिनांक 27 जून रोजी दुपारी 4 वाजता शासकीय विश्रामगृह कोल्हापूर येथे आगमन व स्थानिक लोकप्रतिनिधींशी चर्चा, सायं. 4.30 ते 6.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर येथे कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या अनुषंगाने उद्भवलेल्या परिस्थितीबाबत आणि कायदा व सुव्यवस्थेबाबत आढावा बैठक, रात्री, शासकीय विश्रामगृह येथे मुक्काम.
          रविवार, दिनांक 28 जून रोजी सकाळी 9.00 वाजता कोल्हापूर येथून मोटारीने साताराकडे प्रयाण.
00000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.