** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Saturday, June 27, 2020

आजअखेर 713 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



       कोल्हापूर,दि. 27 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी 10 वाजेपर्यंत 273 प्राप्त अहवालापैकी 249 निगेटिव्ह तर 16 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. यापूर्वी पाठविण्यात आलेला 2 अहवाल पॉझीटिव्ह तर 1 अहवाल पुन्हा पॉझिटिव्ह. तर 5 अहवाल प्रलंबित आहेत. जिल्ह्यात आजअखेर एकूण 797 पॉझीटिव्हपैकी 713 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 74 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
       आज सकाळी 10 वाजेपर्यंत प्राप्त 16 पॉझीटिव्ह अहवालामध्ये गडहिंग्लज- 3, हातकणंगले-1, करवीर-2, पन्हाळा-1 नगरपरिषद क्षेत्र -8 व कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्र -1  असा समावेश आहे.
            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 78, भुदरगड- 74, चंदगड- 81, गडहिंग्लज- 100, गगनबावडा- 6, हातकणंगले- 14, कागल- 57, करवीर- 25, पन्हाळा- 28, राधानगरी- 68, शाहूवाडी- 184, शिरोळ- 8, नगरपरिषद क्षेत्र- 26, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-37 असे एकूण 786 आणि पुणे -2, सोलापूर-3, मुंबई-2, नाशिक -1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 11 असे मिळून एकूण 797 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
            जिल्ह्यातील एकूण 797 पॉझीटिव्ह रूग्णांपैकी 713 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 10 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 74  इतकी आहे.
0 0 0 0 0 0


No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.