** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Thursday, June 18, 2020

आजअखेर 668 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



कोल्हापूर जिल्ह्यात,दि. 18 (जिल्हा माहिती कार्यालय): आज रात्री 8 वाजेपर्यंत 26 प्राप्त अवालापैकी एकही अहवाल पॉझीटिव्ह आला नाही. एक अहवाल नाकारण्यात आला.  जिल्ह्यात आजअखेर 728 रूग्णांपैकी 668 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेरजिल्ह्यात एकूण 52 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 76, भुदरगड- 71, चंदगड- 75, गडहिंग्लज- 84, गगनबावडा- 6, हातकणंगले- 11, कागल- 57, करवीर- 21, पन्हाळा- 27, राधानगरी- 67, शाहुवाडी- 180, शिरोळ- 7, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-27 असे एकूण 720 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-1, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 8 असे मिळून एकूण 728 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
जिल्ह्यातील एकूण 728 रूग्णांपैकी 668 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 52 इतकी आहे.
0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.