** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Wednesday, June 24, 2020

महिनाभरात १६४ फ्लाईटसमधून ३ हजार ४२९ जणांचा प्रवास





कोल्हापूर, दि. २४ (जिल्हा माहिती अधिकारी)- २५ मे पासून आजअखेर १६४ फ्लाईटसमधून ३ हजार ४२९ जणांनी प्रवास केला. कोरोनाच्या आपत्तीजनक परिस्थितीत विमानतळ प्राधिकरणास सहकार्य केल्याबद्दल प्राधिकरणाचे संचालक कमल कटारिया यांनी प्रवाशांचे आभार व्यक्त केले आहेत.
    कोरोनासारख्या आपत्तीमध्ये कोल्हापूरमधून हैद्राबाद, बेंगलुरु आणि तिरुपतीकडे जाणाऱ्या  विमानसेवेचा लाभ प्रवाशांनी घेतला आहे. यासाठी कमीत-कमी कर्मचारी आतून आणि बाहेरील परिसर निर्जंतुकीकरण करण्यासाठी आपली सेवा बजावत आहेत. प्रवाशांची सुरक्षिततेला प्राधान्य देत या सर्वांनी आवश्यक ती खबरदारी घेतली आहे.
0000

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.