** जिल्हा माहिती कार्यालयाच्या संकेतस्थळावर आपले स्वागत ** बातम्या, लेख, पर्यटन विषयक माहिती, पत्रकारांसाठीच्या विविध योजना, लोकराज्यसह इतर **

Monday, June 22, 2020

आजअखेर 684 जणांना डिस्चार्ज -डॉ. बी. सी. केम्पी पाटील



       कोल्हापूर,दि. 22 (जिल्हा माहिती कार्यालय): आज सकाळी 10 वाजेपर्यंत 87 अहवाल प्राप्त झाले असून प्राप्त अहवालापैकी 85 अहवाल निगेटिव्ह तर 2 अहवाल पॉझीटिव्ह आहेत. जिल्ह्यात आजअखेर 738 रूग्णांपैकी 684 जणांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजअखेर जिल्ह्यात एकूण 46 पॉझीटिव्ह रुग्ण आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बी. सी. केम्पी-पाटील यांनी आज दिली.
       आज सकाळी 10 वाजेपर्यत प्राप्त 2 पॉझीटिव्ह अहवालामध्ये चंदगड तालुक्यातील-1 व गडहिंग्लज तालुक्यातील -1 असा समावेश आहे.
            आजअखेर तालुका, नपा आणि मनपा क्षेत्रनिहाय रुग्णांची संख्या पुढीलप्रमाणे - आजरा- 76, भुदरगड- 73, चंदगड- 76, गडहिंग्लज- 89, गगनबावडा- 6, हातकणंगले- 11, कागल- 57, करवीर- 21, पन्हाळा- 27, राधानगरी- 68, शाहुवाडी- 180, शिरोळ- 8, नगरपरिषद क्षेत्र- 11, कोल्हापूर महापालिका क्षेत्र-26 असे एकूण 729 आणि पुणे -1, सोलापूर-3, मुंबई-2, कर्नाटक-2 आणि आंध्रप्रदेश-1 असे इतर जिल्हा व राज्यातील 9 असे मिळून एकूण 738 रुग्णांची आजअखेर जिल्ह्यात संख्या आहे.
            जिल्ह्यातील एकूण 738 रूग्णांपैकी 684 रूग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. तर एकूण 8 जणांचा मृत्यू झाला असल्यामुळे आजअखेर उपचारार्थ दाखल झालेल्या जिल्ह्यातील रूग्णांची संख्या 46 इतकी आहे.
0 0 0 0 0 0

No comments:

Post a Comment

Note: Only a member of this blog may post a comment.